राहुरी: दरडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या,घटनेने एकच खळबळ
राहुरी तालुक्यातील दरडगाव येथील विवाहित महिलेने गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई जालिंदर खामकर (वय ४५ ) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सदर घटना कशामुळे घडली याचा तपास पोलीस घेत आहेत.