नागपूर-उमरेड महामार्गावरील पांडव इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात आज एका अज्ञात व्यक्तीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उमरेड रोडवर असलेल्या पांडव कॉलेजच्या समोर असलेल्या एका झाडाला एका व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांना दिसून आला.