धुळे: कापडणेत शुद्ध पाण्यासाठी ग्रामस्थांचा घंटानाद; फटाक्यांच्या आवाजात प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न.
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे तालुक्यातील कापडणे गावात शुद्ध पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात ग्रामस्थांनी आज अभिनव आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ फटाके फोडून व घंटानाद करत ग्रामपंचायत आणि प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भामरे, विशाल शिंदे यांच्यासह नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.