पुरंदर: नीरा येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी
Purandhar, Pune | Apr 23, 2024 पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज दिनांक 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता नीरा नदीकाठावरील हनुमान मंदीरात हनुमान मूर्तीला अधिषेख घालून विजयकुमार वसंतराव जाधव आणि संतोष वसंतकुमार जाधव यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला .यावेळी अनेक भाविक उपस्थित होते. यानंतर हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.