वाशिम: योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्यांक युवकांच्या प्रगतीस गती द्या, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
Washim, Washim | Oct 17, 2025 अल्पसंख्यांक युवकांच्या प्रगतीसाठी शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांचा खर्या अर्थाने फायदा युवकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आणि रोजगार या क्षेत्रात ठोस परिणाम साधावेत. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दि. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले.