दलित समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून शासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते संजय गाडे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दलितांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्यास तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला.