गोंदिया: फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढला कॅण्डल मार्च...
गोंदिया शहरातील नेहरू चौक येथे महिला डॉक्टरला वाहिली श्रद्धांजली. गोंदियात फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येनंतर कँडल मार्च काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहापासून तर नेहरु चौक पर्यंत निघालेल्या या मार्चमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरांनी न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी केली.