अर्जुनी मोरगाव: ग्रामीण भागातुनही एखादा धोनी तयार व्हावा जिल्हा परिषद सदस्य सौ.रचनाताई गहाणे यांचे प्रतिपादन
ग्रामीण भागातुनही एखादा धोनी तयार व्हावा जिल्हा परिषद सदस्य सौ. रचनाताई गहाणे यांनी भिवखिडकी येथे प्रतिपादन केले. त्या भिवखिडकी येथे  क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रचनाताई गहाणे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्टवादी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे होते. अतिथी म्हणुन इंजी. राजेश लांजेवार, माजी सरपंच अरविंद नागपुरे, सरपंच धनराज कांबळे, माजी सैनिक राजेश नेवारे, उपसरपंच नीलकंठ बोरकर, पो.पा. मोसमीताई बोरकर, उषाताई नेवारे, विजया नेवारे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.