गंगाखेड: गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे खळी येथील पुलावर पाणी सात गावांचा संपर्क तुटला
गंगाखेड तालुक्यातील खळी येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला आहे.त्यामुळे बॅकवॉटरचे पाणी खळी येथील ओढ्यात आल्याने सोमवारी दिनांक 15 रोजी दुपारी दोन वाजता खळी येथील ओढ्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने खळीसह चिंचटाकली,गौंडगाव,धारासुर,सावंगी ब्रम्हनाथ वाडी पुर्नवसन खळी या गावचा संपर्क तुटला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या गावात प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे संपर्क साधला आला नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला