मुळशी: हिंजवडीत धक्कादायक प्रकार ! 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं
Mulshi, Pune | Nov 27, 2025 हिंजवडीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीस चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून सेविका आणि मदतनीस बैठकासाठी बाहेर गेल्याचं उघड झालं आहे. मिळालेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलं अक्षरशः रडत बसलेली दिसतात, ज्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप उसळला.