लाखनी: प्रवासी रेल्वेखाली आल्याने पाय तुटला ! भंडारा रेल्वे स्थानकावरील घटना
भंडारा रेल्वे स्थानकावर १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता भीषण अपघात घडला. शालीमार एक्सप्रेस नागपूरवरून गोंदिया दिशेने येत असताना एका प्रवाशाचा तोल जाऊन तो थेट रेल्वेखाली पडला. या अपघातात संबंधित प्रवाशाचा पाय गंभीर जखमी झाला असून तो कापला गेला आहे. दुपारी साधारणतः ३ वाजण्याच्या सुमारास शालीमार एक्सप्रेस भंडारा स्थानकावर दाखल झाली. याचवेळी प्लॅटफॉर्मवर असलेला प्रवासी चुकून घसरून थेट रेल्वेखाली पडला.