कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ मध्ये बनावट आयकर अधिकाऱ्यांची डॉक्टरच्या घरी धाड,सोन्याचांदीचे दागिने रोख रक्कम लंपास
हिंदी चित्रपट सृष्टीतील स्पेशल 26 या चित्रपटाला लाजवेल अशी घटना कवठेमहांकाळ शहरात घडली आहे कवठेमहांकाळ शहरातील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी म्हेत्रे यांच्या घरात रात्री अकरा वाजता अज्ञात तीन पुरुष व एक महिला यांनी घरात घुसून आम्ही आयकर विभागाचे अधिकारी आहोत असे सांगून, घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केलेला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील नामांकित असलेल्या गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी म्हेत्रे यांच्या घरात हा प्रकार घडल्याने खळखळ माजली आहे