पाथर्डी: कोरडगावातील पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला. आपत्तीग्रस्त ग्रामस्थ मदतीच्या प्रतीक्षेत...
अतिवृष्टी आणि पुरपरिस्थिती मुळे पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात नदया नाल्यांना पूर आल्यामुळे पूल वाहून गेलाय. कोरडगावसह तालुक्यातील दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटलाय, आठ-दहा दिवसांपासून गावामध्ये लाईट नाही. दळणासाठी आजूबाजूच्या गावामध्ये जाव लागतं. वारंवार मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही. मंत्री - पुढारी गावच्या डांबरी रस्त्यावर येऊन गेले. आम्ही मरायला लागलो पण आमच्याकडे लक्ष दयायला कुणालाही वेळ नाही अशा तीव्र शब्दामध्ये कोरडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या.