नवीन वर्षाचे स्वागत केवळ पाश्चात्य पद्धतीने न करता, भारतीय संस्कृती आणि गोसेवेचा वारसा जपत ध्यान फाउंडेशनच्या वतीने गराडा येथील विदर्भातील सर्वात मोठ्या गोशाळेत नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. या विशेष प्रसंगी गोशाळेतील गाईंचे पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले. गाईंना केळी आणि गूळ भरवून तसेच त्यांचे औक्षण करून उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.