दक्षिण सोलापूर: एम के फाऊंडेशन अध्यक्ष महादेव कोगनुरे यांची गुंजेगाव पूरग्रस्तांना भेट...
सिना नदीच्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव परिसरातील शाळेत स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्त गावकऱ्यांची एम के फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता भेट घेऊन त्यांच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेत मदतीचे आश्वासन दिले.