घाटंजी: विनयभंग प्रकरणात आरोपीस एक वर्षाचा कारावास,राजेगाव शेतशिवारामध्ये घडली होती घटना
13 जानेवारी 2020 ला दुपारच्या सुमारास राजेगाव शेत शिवारात आरोपीने महिलेला कौटाळून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी घाटंजी येथील प्रथम वर्ग न्यायाधीश पी.आर पाटील यांच्या न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीस एक वर्ष कठोर कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली.निरंजन उर्फ वीरेंद्र पराचे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.