धर्माबाद: मराठवाडा जनहित पार्टीच्या विराट पायी रॅलीने शहर दुमदुमले, मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती
धर्माबाद नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाच्या वतीने आपापल्या परीने प्रचार व प्रसार मोठ्या जोमाने सुरू आहे यातच ह्या निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टी ही देखील निवडणुकीमध्ये उभी असून आजरोजी दुपारी 4 ते 5:30 च्या दरम्यान शहरातील मुख्य रस्त्याने पायी रॅली काढली होती, ह्या रॅलीमध्ये असलेल्या महिला व नागरिकांची संख्या ही हजारोच्या संख्येने होती, प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाकडून निघालेली ही रॅली न भूतो न भविष्याति अशी होती. ह्या रॅलीने शहर मात्र गुलाबीमय...