गोंदिया: राका गावात भीषण आग अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत शासनाकडून तातडीने मदतीची मागणी
तालुक्यातील राका गावात दि.7 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अपंग रेखा हरी इरले आणि तिचे वडील हरी माधो इरले यांचे राहते घर जळून पूर्णतः स्वाहा झाले प्राथमिक माहितीनुसार ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते आग इतकी भयानक होती की काही क्षणातच दोन्ही घरे पेट घेतली आणि पाहता पाहता संपूर्ण संसार जळून खाक झाला या आगीत घरातील धान्य कपडे शालेय पुस्तके दागिने रोख रक्कम आणि आवश्यक वस्तू सर्व काही भस्मसात झाली विशेष म्हणजे रेखा ही अपंग असून स्वतंत्रपणे राहते