वाशिम: एकबुर्जी प्रकल्पावर वाढली पर्यटकांची गर्दी, जीवरक्षकांची तैनाती आवश्यक
Washim, Washim | Sep 22, 2025 वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला असून हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे या प्रकल्पाच्या सांडव्यावर वाशिम शहर आणि परिसरातील नागरिक पर्यटनाला म्हणून येथे घेत असतात, सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढला असून या ठिकाणी प्रशासनातर्फे कोणतेही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने प्रशासन यांनी या ठिकाणी जीव रक्षक ठेवावा आणि पर्यटकांच्या हुल्लडबाजी ला आळा घालावा .