धुळे: धुळे शहराला 'रेड अलर्ट', वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Dhule, Dhule | Sep 27, 2025 धुळे शहरासाठी हवामान विभागाने आज, २७ सप्टेंबर रोजी सायं. ६ ते रात्री ९ या वेळेत ‘रेड अलर्ट’ दिला आहे. या काळात ४१ ते ६१ किमी वेगाने वारे आणि प्रति तास १५ मिमी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे झाडे पडणे, पाणी साचणे व जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडता सतर्क राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.