देवगड: देवगड येथे वारंवार चोरीच्या घटना : पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी #jansamasya
देवगड सडा येथे नगरपंचायतीसमोरील एक बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले, याबाबतची माहिती आज येथील अनिल खडपकर कुटुंबियांनी दिली. अशा घटना येथे रोजच घडत असून पोलिसांनी याबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खडपकर कुटुंबियांनी केली आहे. सध्या येथे चोरीच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे.