जालना: गल्हाटी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरल्याने जलपूजन सोहळा; शेतकर्यासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
Jalna, Jalna | Sep 19, 2025 अंबड तालुक्यातील सर्वात मोठा असलेला गल्हाटी मध्यम प्रकल्प हा शंभर टक्के भरल्याने गल्हाटी धरण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता जलपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी गल्हाटी धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष राधाकिसन मैंद, उपाध्यक्ष पांडुरंग गटकळ,सचिव तथा वसंतनगरचे सरपंच अशोक जाधव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,प्रगतिशील शेतकरी राजेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.