नागपूर-तुळजापूर महामार्गावर आज पहाटे एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. यवतमाळ जवळील 'सामका पंचकर्म सेंटर' परिसरात रेल्वे विभागाच्या एका भरधाव बोलेरो गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या नीलगायीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नीलगाय जागीच ठार झाली असून, रेल्वेच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, गाडीतील रेल्वे कर्मचारी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत.