हिंगोली: रामलीला मैदान येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने गाळ्यांचा लिलाव व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दसरा महोत्सवासाठी गाळ्यांच्या लिलाव बोली प्रक्रेला आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी अकरा वाजता दरम्यान सुरुवात झाली. या प्रक्रियेला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, बोली लावण्यासाठी व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.