संगमनेर: चंदनापुरी घाटात कंटेनरचा भीषण अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
चंदनापुरी घाटात कंटेनरचा भीषण अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली नाशिक–पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज सकाळी 7 सुमारास एका कंटेनरचा भीषण अपघात झाला. मोठमोठे लोखंडाचे पाते घेऊन जाणारा हा कंटेनर पुण्याहून संगमनेरमार्गे कोलकात्याकडे जात असताना आनंदवाडी जवळ चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला घसरला आणि त्यातील लोखंडी पाते रस्त्यावर विखुरली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.