अमळनेर: खासगी बसच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; बसचालक अटकेत, अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील गडखांब गावाजवळ शनिवारी (१८ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ७ वाजता झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका खासगी लक्झरी बस आणि दुचाकी यांच्यात हा विचित्र अपघात झाला. या प्रकरणी रात्री उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात बसचालकावर निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.