नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता मानवी–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी एकात्मिक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी नाशिक–अहिल्यानगर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. या आराखड्यानुसार जिल्ह्याचे High Risk व Medium Risk Zone असे वर्गीकरण करून क्षेत्रनिहाय, कालबद्ध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. सुरक्षित पकड कार्य, उपचार व पुनर्वसन केंद्रे तसेच जनजागृतीवर भर