2025 - 26 या वर्षातील किमान आधारभूत योजनेअंतर्गत कापसाच्या खरेदीचा शुभारंभ मे. श्रीराम जिनिंग प्रेसिंग मिल मनसर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान यांचे हस्ते सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान करण्यात आला. यावेळी जिनिंग मिल मालक सौरभ चौकसे यांचे सहित सचिव हनुमंता महाजन शासकीय कापूस केंद्र प्रमुख राहुल कहारे सहित शेतकरी बांधव उपस्थित होते.