भंडारा: घराच्या संडासमध्ये घेतला मृत्यूचा घोट! पाच दिवस जीवन-मरणाशी झुंज देऊन युवकाचा मृत्यू ; आसगाव हादरले
आसगाव गावातील ३३ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या संडासमध्ये जाऊन विषारी औषध प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल पाच दिवसांपर्यंत मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव विशाल केशवराव मेंढे (वय ३३, रा. आसगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास विशाल मेंढे यांनी विषारी औषध प्राशन केले. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.