चंद्रपूर: भिवकुंड येथे वीज कोसळल्याने बैल जागीच ठार
चंद्रपुरातील भिवकुंड येथे वीज कोसळल्याने बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली आहे.मागील चार ते पाच दिवसंपासून जिल्ह्यात सर्वत्र मेघगर्जनेसह पाऊस सुरू असून ठिकठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.दरम्यान भिवकुंड येथील शेतकरी आनंद गायकवाड यांच्या मालकीच्या बैलावर वीज कोसळली असून बैल जागीच ठार झाला आहे.