जालना ( दि.२३) राज्य शासनाचा आरोग्य सेवेतील वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महा-आरोग्य सन्मान पुरस्कार जालना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी व ग्रामीण रुग्णालय भोकरदन या आरोग्य संस्थांना जाहीर झाला. रविवार ( दि.२२) रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथील कार्यक्रमात मा. आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर व राज्य आरोग्य मंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांच्या शुभहस्ते डॉ. राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ कृष्णा वानखेडे वैद्यकीय अधीक्षक व डॉ. चैतन्य डाके THO परतुर यांना आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.