भंडारा-तुमसर मार्गावर असलेल्या दाभा मोडजवळील आदित्य लॉनसमोर सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने (क्रमांक MH 40 DC 3577) एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वार निलेश शेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. निलेश शेंडे (रा. आंबेडकर वार्ड, वरठी) हे व्यवसायाने फोटोग्राफर होते आणि ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या एम.एच. ३६ ए.एन. २२२९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना हा काळाने त्यांच्यावर घाला घातला.