स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत एकहाती सत्ता काबीज केली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपाचे मनोज कोरडे यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. या विजयामुळे नरखेड शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत प्रस्थापित विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला असून त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.