स्थानिक गुन्हे शाखा आणि जलालखेडा पोलिसांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करत फसवणूक व चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी अमरावती येथील रहिवासी असून त्यांचे नाव रामराव ढोबळे व अमोल धानोरकर असे सांगण्यात आले आहे. या आरोपींकडून तीन गुन्ह्यांचा खुलासा करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि फसवणूक करून चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 63 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.