कोपरगाव: सुरेगाव येथे १ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे आ.काळे यांच्या हस्ते भूमिपूजन
सुरेगाव येथे १ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन आज १८ ऑक्टोबर रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये तलाठी कार्यालय इमारत व निकमनगर रस्ता खडीकरण करणे कामाचे लोकार्पण तसेच दशक्रियाविधी शेड बनवणे, मोतीनगर स्मशानभूमी रस्ता करणे व स्मशानभूमी सुशोभीकरण करणे (टप्पा 1 व 2) आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचे भूमिपूजन संपन्न झाले.