शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे अंगावर थुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका 29 वर्षीय युवकास चौघांनी मिळून बेदम मारहाण करून फायटरने गंभीर दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या वादात साजन धनराज भिल वय 29, रा. कळमसरे हा जखमी झाला.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयीत राजू दगडू कोळी, संजय राजू भिल, रोहित दगडू कोळी व संदीप अभिमन मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.