भोकरदन: कोपर्डा येथे संत बलदेवदास महाराज पालखी सोहळा उत्सवात संपन्न
आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही संत बलदेवदास महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते, यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये गावातून ही पालखी सोहळा आज मिरवण्यात आला अगदी शिस्तबद्ध पद्धतीने व शांततामय वातावरणात ही पालखी आज कोपर्डा नगरीमध्ये संपन्न झाली आहे.