चंद्रपूर: चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट मंदिराजवळ ट्रक उलटला, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट मंदिराजवळ सोमवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ट्रक उलटला, यात मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.