विक्रमगड: जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट
प्रादेशिक हवामानाने विभाग मुंबईद्वारे जारी करण्यात आलेले हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारे, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस काही ठिकाणी, तर इतरत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.