रामटेक: तालुक्यातील तोतलाडोह धरणाचे दोन दरवाजे 0.3 मीटरने उघडले
Ramtek, Nagpur | Sep 16, 2025 रामटेक तालुक्यातील पेंच अभयारण्यातील महत्त्वपूर्ण तोतलाडोह धरणात 99% च्या वर जलसाठा होताच मंगळवार दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान धरणाच्या एकूण 14 गेट पैकी दोन गेट 0.3 मीटरने उघडण्यात आल्याचे पेच सिंचन विभाग रामटेक द्वारे सांगण्यात आले आहे. 16 सप्टेंबरला सकाळी 99.53% जलसाठा झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.