पाटोदा: तालुक्यातील सौताडा घाटात मोठी दुर्घटना टळली
Patoda, Beed | Oct 29, 2025 पाटोदा तालुक्यातील सौताडा घाटात सध्या रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी टाकलेल्या मातीमुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे घाटातून जाणाऱ्या वाहनांना सटकण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज गुरुवार दि.29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पावसामुळे एक बस घाटातून जात असताना घसरून रस्त्याच्या कडेला गेल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांना येथून प्रवास करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून, शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने कळविले आहे.