यवतमाळ: श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून १६०० प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन
यवतमाळ जिल्ह्यात जवळपास १६०० दिव्यांगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्रलंबित दाखवत आहे.तरी ज्या दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी केली असेल त्यांना पुढील ७ दिवसात सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे येऊन प्रमाणपत्र मिळवून घ्यावे असे आवाहन महाविद्यालयाकडून दिव्यांग व्यक्तींना करण्यात आले.