पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या पावडदौना शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरुन पोलिसांनी रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुद्ध मौदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास मौदा पोलीस करीत आहेत.