रोहा, पुण्याकडूनबीडकडे येणाऱ्या बसने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल सायंकाळी काकडहिरा परिसरात घडली. बीड तालुक्यातीलकाकडहिरा येथील शेतकरी विश्वास बागलाने हे मोटारसायकलवरून गावाकडे जात असतांना पुण्याकडून बीडकडे येणाऱ्या बस क्रमांक एम.एच.१४.०१९७ ने बागलाने यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात विश्वास बागलाने यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.