भंडारा: भंडारा नगरपरिषद निवडणुकीसाठी नागरिकांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावावा: माजी खासदार सुनील मेंढे यांचे आवाहन
भंडारा नगरपरिषद निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शांतता, शिस्त आणि उत्साहात पार पडत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी या लोकशाहीच्या पर्वात सहपरिवार मतदान केंद्रावर जाऊन आपला अमूल्य हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, 'मतदान हा केवळ अधिकार नाही, तर आपल्या शहराच्या प्रगतीची सामूहिक जबाबदारी आहे'. भंडाऱ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनीही आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, अशी मनापासून विनंती त्यांनी दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपा