अंजनगाव सुर्जी शहरातील महावीर नगर येथे आज बुधवार,दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त ग्राहकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या संबंधित विभागाकडे पाठवून लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी या दिनाचे आयोजन महावीर नगर येथील योग भवन येथे करण्यात आले होते.