धुळे शहरालगतच्या सुरत बायपास-संबोधी नगर परिसरात ऊस तोडणी कामगारांच्या नावावर तब्बल ९ लाख ७८ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऊस वाहतूक व्यावसायिक रोशन रमेश ढिवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका मुकादमाने बनावट कामगार उभे करून रोख व ऑनलाइन रक्कम घेतली, मात्र कामगार न पाठवता पैसेही परत केले नाहीत. ढिवरे यांच्या फिर्यादीवरून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.