नांदगाव: तांदूळवाडी येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या मुलाला नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या दोन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे राहणाऱ्या साहेबराव काळे यांच्या मुलाला तलाठी म्हणून नोकरी लावून देतो असे म्हणून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 5,लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याने या संदर्भात शरद शिरसाट समाधान जगताप या दोघांविरोधात नांदगाव पोलिसात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय बहाकर करीत आहे