खुलताबाद: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी; खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीची तहसीलदारांकडे मागणी
खुलताबाद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस, कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, तुर, कांदा, फळबागांसह खरीप हंगामातील जवळपास सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल नलावडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनात शेतकऱ्यांना तातडीने सरसकट हेक्टरी किमान ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली