कोपरगाव: कोपरगाव तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज दि. १३ ऑक्टोबर रोजी पार पडली. जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे तर पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी सायली सोळंके आणि तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली.